राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच या निवडणुका जाहीर केल्या जातील अशी माहिती विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.

बेळगाव जिल्ह्यात सध्या पिण्याच्या पाण्याची कोणतीही टंचाई नसून कोणत्याही तातडीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पूर्णपणे सज्ज आहेत.

ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी स्थानिक पातळीवर तातडीने ट्रॅक्टर भाड्याने घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या लोकप्रतिनिधींऐवजी प्रशासक असल्यामुळे नागरिकांना काही तात्पुरत्या अडचणी येत असल्या तरी एसआर प्रक्रिया संपताच निवडणुका घेण्यासाठी सरकार तयार असल्याचे चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले.
डी. के. शिवकुमार यांनी मुख्यमंत्री व्हावे ही राज्यातील लाखो लोकांची इच्छा आहे. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी गेली सत्तावीस वर्षे पक्षात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी त्यांना योग्य वेळी मंत्रिमंडळात स्थान देतील अशी प्रतिक्रिया चन्नराज हट्टीहोळी यांनी दिली.
राज्यातील पाचही गॅरंटी योजना अत्यंत यशस्वी ठरल्या असून यामुळे लाखो महिला स्वावलंबी झाल्या आहेत. केवळ तांत्रिक पडताळणी आणि मतदार ओळखपत्राच्या सुसूत्रीकरणासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असून कोणत्याही योजना बंद होणार नसल्याचे चन्नराज हट्टीहोळी यांनी म्हटले. शासकीय योजनांचा लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विनाअडथळा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.


Recent Comments