Belagavi

बेळगावात महिन्याभरानंतर वरुणाचे आगमन: हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी

Share

बेळगाव जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांपासून मान्सूनचे आगमन झाले असून संपूर्ण जिल्ह्यात ढगाळ आणि आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीपेक्षा सुमारे एक महिना उशिरा दाखल झालेल्या या पावसामुळे हवामान विभागाने जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे.

बेळगाव जिल्ह्यात कालपासून पाऊस सुरू झाल्याने हवेत छान गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळचा पाऊस नेहमीपेक्षा एक महिना उशिरा सुरू झाला असला तरी यामुळे बळीराजा सुखावला आहे. शालेय विद्यार्थी आणि नागरिक रस्त्यांवर छत्र्या घेऊन पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत. आगामी दिवसांत पावसाची गती वाढण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पूर्वतयारी ठेवण्याचे आवाहन केले आहे.

Tags: