मोहरम सणानिमित्त बागलकोट जिल्ह्यातील बदामी तालुक्यातील केरूर पोलीस ठाण्याच्या आवारात जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या या पारंपरिक सणाची मिरवणूक केरूर पोलीस ठाण्यात आली असता, तेथील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचे भक्तीभावाने स्वागत केले.

यावेळी कर्तव्यवर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडून अत्यंत श्रद्धेने आणि भक्तीभावाने आरती ओवाळून पूजा करण्यात आली. जात-पात आणि धर्म विसरून या सलोख्याच्या वातावरणात सहभागी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या घटनेमुळे केरूर पोलीस ठाण्याच्या परिसरात सलोखा आणि एकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Recent Comments