NANDAGAD

धारवाड सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Share

धारवाड येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले.

शाळेत आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात दहावीच्या परीक्षेत उत्तम श्रेणी मिळवून उत्तीर्ण झालेल्या हयात बावाखान याच्यासह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करताना शाळेचे प्राचार्य फादर सिल्वा रेड्डी यांनी, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केल्याचे सांगितले.

या प्रसंगी फादर प्रशांत पिंटो, इझोबिअर डिसोजा यांच्यासह शिक्षिका लीना अल्लमेडिया, श्रीजा गोम्स आणि शाळेतील इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.

Tags: