hubali

मंत्रिपदासाठी हुबळीत सलिम अहमद यांच्या समर्थकांचे रास्ता रोको आंदोलन

Share

विधान परिषदेचे मुख्य प्रतोद सलिम अहमद यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे, या मागणीसाठी आज हुबळीत त्यांच्या समर्थकांनी आणि चाहत्यांनी भव्य मोर्चा काढून तीव्र निदर्शने केली.

हुबळी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्तुळाजवळ समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केले. अल्पसंख्याक कोट्यातून सलिम अहमद यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी या वेळी केली. मुख्य प्रतोद म्हणून ते लोककल्याणासाठी कार्यरत असून, मंत्रिपद मिळाल्यास त्यांच्याकडून अधिक गतीने विकासकामे होतील, असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला. ही मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनात काँग्रेस नेते एस. डी. मकानदार, शाहजमान मुजाहीद, इनायत खान पठाण आणि परवेझ ब्याहट्टी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: