Belagavi

कणबर्गी भागात बससेवा पुरविण्यासाठी परिवहन विभागाला निवेदन

Share

बेळगाव शहरातील कणबर्गी भागात अपुऱ्या बससेवेच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या मागणीसाठी आज माजी महापौरांच्या नेतृत्वाखाली विभागीय नियंत्रकांना निवेदन देण्यात आले.

कणबर्गी गावात बस फेऱ्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी माजी महापौर शिवाजीराव सुंटकर यांच्या नेतृत्वाखाली केएसआरटीसी विभागीय नियंत्रकांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले.

या वेळी किसान सुंठकर अ‍ॅड. शिवाजी पाटील, अ‍ॅड. श्रीनिवास येणगी, प्रभाकर मन्नोलकर, राजू दस्क, सुरेश गोवेकर, सिद्धराय घंटेकर, धाकलु सुंटकर, अप्पा चौगुले, बाळू मलाई आदी प्रमुख उपस्थित होते.

नागरिकांची तक्रार ऐकून घेतल्यानंतर विभागीय नियंत्रकांनी मागणीनुसार बस सेवा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले. तसेच विद्यार्थी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियमितपणे बस सुरू ठेवण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Tags: