राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली बेळगावमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. जमिनीचा उतारा मिळवण्यासाठी होणारी बेकायदेशीर वसुली आणि संगणकीकृत उताऱ्यांसाठी सुरू असलेल्या मनमानी कारभाराचा निषेध शेतकऱ्यांनी केला आहे.

जमिनी एकत्र असल्याने ३० ते ४० उताऱ्यांसाठी शेतकऱ्यांना विनाकारण शुल्क भरावे लागत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी उतारे स्वतंत्र करून देण्याचे आश्वासन देऊनही, तसीलदार प्रति एकर १,००० रुपयांची सक्ती करत आहेत. प्रशासकीय चुकीचा फटका शेतकऱ्यांना का, असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.

ग्रामीण भागात ३०-४० वर्षांपासून वास्तव्य असलेल्या गरीब शेतकऱ्यांना आता खरेदी पत्राची सक्ती केली जात आहे. मूळ मालक मयत झाल्यानंतर वारसदार पैशांची मागणी करत असल्याने सामान्य शेतकरी हवालदिल झाला आहे. ही लूट थांबली नाही, तर भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राज्य किसान संघाचे अध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी दिला आहे.


Recent Comments