बेळगावमध्ये राज्य ऊस उत्पादक संघटनेच्या कुरुबर शांतकुमार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. खत वितरणासाठी ‘एफआयडी’ सक्ती रद्द करण्यासह शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधण्यात आले.


राज्य ऊस उत्पादक संघटनेच्या कुरुबर शांतकुमार गटाच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.

खत वितरणासाठी ‘एफआयडी’ क्रमांकाची सक्ती केल्यामुळे शेतकरी खतांपासून वंचित राहत असून ही अट त्वरित रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली. कृषी पंपसेटचे खाजगीकरण करण्यास शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून ऊसाचा एफआरपी दर वैज्ञानिक पद्धतीने पुन्हा निश्चित करावा, अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना विशेष सवलतीच्या दरात डिझेल द्यावे, २०२५-२६ हंगामातील १५०० कोटी रुपयांची ऊसाची थकबाकी त्वरित मंजूर करावी, रामदुर्ग आणि बादामी तालुक्यातील प्रलंबित सिंचन योजनांची कामे पुन्हा सुरू करून बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी सुरेश पाटील यांनी केली.
या प्रसंगी राज्य ऊस उत्पादक संघटनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments