बेळगाव मधील रेल्वे उड्डाणपुलावर वाढलेल्या झाडांमुळे वाहनधारकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गोगटे सर्कल ते गोवावेस मार्गावरील या पुलावर प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

उड्डाणपुलाच्या दुतर्फा व दुभाजकांमध्ये पिंपळ व वडाची झाडे वाढली आहेत. वर्षभरापासून स्वच्छता न झाल्याने फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

झाडांच्या मुळांमुळे पुलाच्या संरचनेला बाधा पोहोचत आहे. ही बाब लक्षात घेता, सामाजिक कार्यकर्ते संतोष दरेकर यांनी महानगरपालिकेकडे पत्र पाठवले आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी ही झाडे हटवून संभाव्य दुर्घटना टाळाव्यात, अशी मागणी संतोष दरेकर यांनी केली आहे.


Recent Comments