State

काँग्रेस सरकारच्या धोरणांमुळे जनतेवर आर्थिक बोजा वाढला : बसवराज बोम्मई

Share

आंतरराष्ट्रीय पातळीवरील तेल संकटामुळे सध्याची परिस्थिती निर्माण झाली असून आगामी दोन आठवड्यांत युद्ध संपल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल. मात्र, राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.

मी मुख्यमंत्री असताना पेट्रोल-डिझेलवर ७ रुपये कर कमी केला होता. मात्र, सिद्धरामय्या सरकारने एक नवा पैसा कमी न करता उलट कर वाढवला आहे. देशात इंधनावर सर्वाधिक कर लादणारे हेच सरकार असून, जनतेची काळजी असेल तर त्यांनी स्वतःच्या हिश्श्याचा कर कमी केला पाहिजे.

काँग्रेसमधील सत्ता हस्तांतरण वरवर सुळसुळीत दिसत असले तरी अंतर्गत वाद अजूनही धुमसत आहेत. खांदेपालटानंतर निर्माण झालेला खात्यांचा गोंधळ हे त्याचेच लक्षण आहे. आमदार आणि मंत्री अजूनही डी. के. शिवकुमार यांना मनापासून स्वीकारू शकलेले नाहीत. राजकारणात स्थिरता असेल तरच चांगले प्रशासन देणे शक्य होते, मात्र काँग्रेसच्या या अंतर्गत संघर्षात सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे, असा घणाघात बसवराज बोम्मई यांनी केला.

Tags: