माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांना राज्यसभेचे तिकीट नाकारल्यावरून ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे यांनी भाजप आणि जेडीएस युतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षांची युती मजबूत नाही, हे या घडामोडीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

माध्यमांशी बोलताना मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्पष्ट केले की, भाजप आणि जेडीएस युतीमध्ये सर्व काही आलबेल नाही. विरोधी पक्ष कमकुवत की मजबूत, याच्याशी आम्हाला देणेघेणे नसून राज्यात उत्तम प्रशासन देऊन लोकांची मने जिंकण्यावर आमचा भर आहे; आम्ही विरोधकांच्या कमकुवतपणावर नाही तर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक जिंकू, असे प्रियांक खर्गे यांनी म्हटले.

केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना, जर भाजपकडे आयटी, इडी आणि सीबीआयसारख्या तपास यंत्रणा नसत्या, तर भाजप हा जेडीएसपेक्षाही खालच्या पातळीवरील एक छोटा प्रादेशिक पक्ष बनून राहिला असता, अशी टीका प्रियांक खर्गे यांनी केली.


Recent Comments