बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. मंत्रिमंडळात अजून २० जागा रिक्त असून ज्येष्ठ नेते रामालिंगारेड्डी यांची नाराजी मुख्यमंत्री दूर करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बेळगावमध्ये माध्यमांशी बोलताना आमदार आसिफ सेठ यांनी सांगितले की, सध्या मंत्रिमंडळात केवळ १२ जणांना संधी देण्यात आली असून अजून २० जागा रिक्त आहेत. जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्या लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह इतरांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. स्वतःला मंत्रिपद मिळण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर, पक्षात अनेक ज्येष्ठ आमदार असून पहिली पसंती ज्येष्ठांनाच मिळाली पाहिजे, असे आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले. आपण स्वतःहून पक्षाच्या वरिष्ठांकडे जाऊन मंत्रिपदासाठी हट्ट करणार नाही, सर्व निर्णय वरिष्ठ घेतील, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील सतीश जारकीहोळी यांना आधीच मंत्रिपद मिळाल्याने ते आमच्या सर्व क्षेत्रांतील कामांना सकारात्मक प्रतिसाद देतील, असा विश्वास आसिफ सेठ यांनी व्यक्त केला.–
—
ज्येष्ठ नेते रामालिंगारेड्डी यांच्या नाराजीबाबत आणि राजीनाम्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आसिफ सेठ यांनी पक्षातील घडामोडींवर प्रकाश टाकला. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आधीच रामालिंगारेड्डी यांच्याशी चर्चा केली असून त्यांची समजूत काढण्यात त्यांना यश येईल, असा विश्वास आसिफ सेठ यांनी व्यक्त केला.



Recent Comments