हुबळीमधील सेंट अँड्र्यूज एज्युकेशन सोसायटीमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीरपणे व्यवस्थापन ताब्यात घेऊन लाखो रुपयांचा गैरव्यवहार करण्यात आला आहे. संस्थेचे जीपीए धारक चार्ल्स कोठारी यांनी पत्रकार परिषदेत हा खळबळजनक आरोप केला.

कायदेशीर अध्यक्ष चंद्रशेखर नेरेळ यांनी दिलेले तीन महिन्यांच्या मुदतीचे जीपीए नोव्हेंबर २०२५ मध्येच रद्द करण्यात आले होते, अशी माहिती चार्ल्स कोठारी यांनी दिली. असे असतानाही सुधा मणिकुंटला, अँथनी भंडारी आणि पुरुषोत्तम कल्लाकुंटला यांच्या गटाने रद्द झालेल्या जीपीएचा गैरवापर केला. त्यांनी बनावट स्वाक्षऱ्या, खोटे राजीनामा पत्र आणि सभेचे खोटे इतिवृत्त तयार करून अधिकाऱ्यांच्या संगनमताने सोसायटीचे नूतनीकरण करून घेतले. तसेच बँक खात्यांमधून लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप चार्ल्स कोठारी यांनी केला आहे.



Recent Comments