राज्य सरकारने ५२ गंभीर गुन्हे मागे घेतल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. काँग्रेस सरकार हे आधुनिक मुस्लिम लीग बनण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका त्यांनी केली.

हुबळीतील पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी काँग्रेस सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. राज्य सरकारने दंगल, दगडफेक आणि पोलीस ठाण्यांवरील हल्ल्यांमधील ५२ गंभीर गुन्हे मागे घेतल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या तुष्टीकरण धोरणाचा निषेध केला. काँग्रेस सरकार हे विशिष्ट घटकांच्या हितासाठी आणि केवळ मुस्लिम बहुल भागांच्या विकासासाठी निधी वाटप करत असून, ही विचारधारा आधुनिक मुस्लिम लीगसारखी असल्याचा घणाघात प्रल्हाद जोशी यांनी केला.

देशातील अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी त्रिपुरा, आसाम आणि पश्चिम बंगालमधून होणाऱ्या बांगलादेशी घुसखोरीला काँग्रेस पाठिंबा देत असल्याचा आरोप केला. इंधनाच्या वाढत्या खर्चाबाबत बोलताना त्यांनी पूर्वी केवळ मध्यपूर्वेवर अवलंबून असलेला भारत आता ४२ विविध स्रोतांकडून इंधन आयात करत असल्याचे स्पष्ट केले. सततच्या पराभवांमुळे राहुल गांधी यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, हे सरकार केवळ सर्वसामान्यांची लूट करणारे असल्याच्या तीव्र शब्दांत प्रल्हाद जोशी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.


Recent Comments