विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यात असलेल्या कोट्याळ गावात एका तरुणाने लग्न ठरत नसल्याच्या कारणावरून मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केले. श्रीशैल नागप्पा रामतीर्थ असे या तरुणाचे नाव असून, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याची समजूत काढून त्याला सुखरूप खाली उतरवले.

कोट्याळ गावातील श्रीशैल रामतीर्थ याने आपले लग्न लावून द्यावे या मागणीसाठी थेट गावातील मोबाईल टॉवर गाठले. तरुण टॉवरवर चढल्याचे समजताच गावात एकच गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अग्निशामक दलासह घटनास्थळी धाव घेतली आणि बऱ्याच वेळच्या प्रयत्नांनंतर त्याला खाली उतरवण्यात यश आले.

यापूर्वी देखील याच तरुणाने दारू आणि गुटखा मिळण्यासाठी दोन वेळा अशाच प्रकारे टॉवरवर चढून गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाच्या अशा वारंवार होणाऱ्या त्रासामुळे कोट्याळ गावातील नागरिक मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.


Recent Comments