बंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी देशातील वाढत्या इंधन आणि गॅस सिलिंडरच्या दरांवरून केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. युपीए आणि एनडीए सरकारच्या काळातील दरांची तुलना करत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका केली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, केंद्र सरकारने सातत्याने किंमती वाढवायच्या आणि आम्ही येथे दर कमी करत बसायचे का? माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पेट्रोल ७० रुपये, डिझेल ४८ रुपये आणि गॅस सिलिंडर अवघा ४१४ रुपयांना होता, याची आठवण त्यांनी करून दिली.

आजच्या घडीला हे दर कुठे पोहोचले आहेत, असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. देशातील सर्वसामान्य जनतेवर पडत असलेल्या या आर्थिक बोजाला थेट केंद्र सरकारच जबाबदार असून, केंद्राची चुकीची धोरणे राज्य सरकारे दुरुस्त करू शकत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments