ARREST

बेळगावात मटका आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

Share

बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात अवैध कृत्यांविरुद्ध पोलिसांनी मोहीम उघडली आहे. टिळकवाडी, कॅम्प आणि बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत केलेल्या कारवाईत मटका आणि जुगार खेळणाऱ्या ६ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून रोकड आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे.

१३ मे २०२६ रोजी शहरभर पोलिसांनी अवैध धंद्यांवर छापे टाकले. टिळकवाडी पोलिसांनी भाग्य नगरमध्ये मटका घेणाऱ्या आनंद बसप्पा होन्नळ्ळी याला ताब्यात घेतले. त्याने जमा केलेली रक्कम संगीता बाळू कमकारट्टी हिच्याकडे देत असल्याचे सांगितल्याने दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत, बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय संतोष दळवी यांच्या नेतृत्वाखाली येळ्ळूर ग्रामानजीक छापा टाकून ओसी जुगार खेळणाऱ्या सागर पांडुरंग कुंडेकर याला ताब्यात घेण्यात आले. तसेच कॅम्प ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या धोबी घाट जवळ जुगार खेळणाऱ्या चौघांना पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या पथकाने पकडले आहे.

या कारवाईत अष्टू लक्ष्मण लामाणी, ॲलेक्स इडदो फ्रान्सिस, सुदीप लक्ष्मण लामाणी आणि महेश गोपाळ पाटील या संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईबद्दल बेळगाव पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Tags: