एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी चेन्नई येथील पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी बेळगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली.


शहरातील राणी चन्नम्मा चौकात जमा झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. “देशाच्या पंतप्रधानांबद्दल असे असंवैधानिक शब्द वापरणे हे राजकीय शिष्टाचाराच्या विरोधात आहे. काँग्रेसची ही वृत्ती लोकशाहीसाठी घातक आहे,” अशी टीका यावेळी करण्यात आली. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये पराभवाच्या भीतीने काँग्रेस नेते अशा प्रकारची विधाने करत असल्याचे भाजप नेत्यांनी म्हटले आहे.
मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या विधानाबद्दल तातडीने सार्वजनिक माफी मागावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही, तर आगामी काळात संपूर्ण राज्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भाजप युवा मोर्चाच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनात मुरुगेंद्रगौडा पाटील, कृष्णा पाटील, शंकर, आरती यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments