Chikkodi

नागरमुन्नोळी गावात संत कनकादास जयंती उत्साहात

Share

चिकोडी तालुक्यातील नागरमुन्नोळी गावात संत कनकादास जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि अद्भूत वातावरणात संपन्न झाला.

यावेळी कनकादासांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली, पारंपरिक कला पथकांच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

या सोहळ्यात बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी कनकादासांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले. कनकादासांचे जीवन, त्यांचे उपदेश आणि कीर्तन आजही लोकांना मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे आहेत. कनकादास हे महान हरिदास संत, तत्त्वज्ञ आणि कीर्तनकार होते. कर्नाटकात भक्ती चळवळीच्या विकासात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कीर्तनांनी समाजाला प्रेरणा दिली ” असे प्रतिपादन त्यांनी केले.

त्यानंतर कनकादास भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात वक्ते पूजारी यांनी भक्त कनकादासांच्या जीवन चरित्रावर सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या हालूमत समाजाचे ज्येष्ठ नेते सिद्धप्पा माऱ्याइ म्हणाले की, “कनकादासांनी समाजात सामाजिक सलोखा आणि मानवी मूल्यांचा संदेश दिला. आज नागरमुन्नोळी गावात कनकादास जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. पुढील वर्षी यापेक्षाही अधिक दिमाखात ही जयंती साजरी करण्यात येईल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राजमा मुलतानी, उपाध्यक्ष शांता बाणे, शंकर हेगडे, शिवू मय्राई, अरुण मय्राई, राजू कुंभार, ज्योतेप्पा खगन्नवर, अनिल ईटी, कुमार ईटी, लगमण्णा बंबलवाडे, एम. के. पूजारी, मारुती मर्य्याई, बाळप्पा बाणे, श्रीशैल नागराळे, सुरेश कोटे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: