बेळगाव शहरात आयटी आणि बीटी कंपन्या सुरू करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज राणी चन्नम्मा चौकात अभियंत्यांनी अनोखे आंदोलन केले.

कर्नाटक रक्षण वेदिका – प्रवीण शेट्टी गटाच्या वतीने चौकात ‘इंजिनिअर समोसा हॉटेल’ उघडून हा अभिनव निषेध नोंदवण्यात आला.
यावेळी संतप्त अभियंत्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, बेळगावात दरवर्षी सुमारे २० हजार विद्यार्थी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करतात. शहरात आयटी-बीटी कंपन्या नसल्याने त्यांना नोकरीसाठी बंगळूर, मुंबई आणि पुणे यांसारख्या शहरांकडे स्थलांतर करावे लागते. परिणामी, मुलांना चांगले शिक्षण देणाऱ्या पालकांना व वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
बेळगावात एकही आयटी-बीटी कंपनी नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि रोजगारासाठी आयटी-बीटी कंपन्या येणे आवश्यक आहे. यास्तव, कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित विभागाने बेळगावात या कंपन्या त्वरित सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली .
या मागणीचे निवेदन अभियंत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला सादर करण्यात आले.


Recent Comments