Belagavi

हिंदू समाजात फूट पाडू नका; ‘तुकडे तुकडे गँग’ला संधी मिळेल – आम.सी.टी. रवी

Share

विधान परिषद सदस्य सी.टी. रवी यांनी बेळगावमध्ये हिंदू समाजातील फुटीवर चिंता व्यक्त केली. हिंदू समाज विभागल्यास ‘तुकडे तुकडे गँग’ला देश तोडण्यास संधी मिळेल, अशी भीती व्यक्त करत त्यांनी बुद्ध, बसव, आंबेडकर आणि कनकदास यांसारख्या कर्मठ विचार दूर करणाऱ्या सर्वांनाच आदर्श मानले पाहिजे, असे स्पष्ट केले.

आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी, कोणत्याही परिस्थितीत हिंदू समाजाला विभागू देऊ नका, असे आवाहन केले. “हिंदू समाज विभागल्यास, राष्ट्रद्रोह्यांना मार्ग मिळू शकतो,” अशी भीती त्यांनी व्यक्त केली. हिंदू समाजाने मूळ तत्त्वज्ञानात अस्पृश्यता आणि जातीयतेचे कधीही समर्थन केलेले नाही. आचरणातील दोष दूर करून, अस्पृश्यता आणि जातीयतेस जागा नसेल अशा पद्धतीने हिंदू समाजाला सशक्त केले पाहिजे.” बुद्ध, बसव, आंबेडकर, कनकदास यांच्यासह चांगले विचार सांगणाऱ्या आणि अनिष्ठ रूढी-परंपरा दूर करण्याचा संदेश देणाऱ्या व्यक्ती आदर्श आहेत. हिंदूंना एकसंध ठेवण्याचे काम केले पाहिजे. “हिंदू समाज विभागला गेल्यास, राष्ट्राला तोडणाऱ्या तुकडे तुकडे गँगसाठी मार्ग तयार होईल आणि याला संधी देऊ नये,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

‘नाभिक समाजा’ बाबत बोलताना आमदार रवी यांनी स्पष्ट केले की, “मी नाभिक समाजाची कोणतीही बदनामी केलेली नाही. चुकीच्या समजुतीला संधी देऊ नये. काही लोक चुकीच्या बातम्या पसरवण्याचे काम करत आहेत.” “माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर मी खेद व्यक्त करतो,” असे नमूद करत त्यांनी, “चुकीच्या पद्धतीने विधान फिरवणाऱ्यांविरुद्ध चौकशी करण्याची मागणी करत आहे,” असे स्पष्ट केले.

यावेळी आमदार अभय पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tags: