
ऊसाला योग्य दर निश्चित करून साखर कारखाने त्वरित सुरू करावेत, या मुख्य मागणीसाठी चिकोडी येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

बसवन चौकात शेकडो शेतकऱ्यांनी मानवी साखळी निर्माण करून सरकारविरोधात तीव्र निदर्शने केली. ऊस पिकाला निश्चित भाव जाहीर करावा, प्रति टन ३,५०० रुपये दर द्यावा, अशा अनेक मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. त्यानंतर, तहसीलदार राजेश बुरली यांच्यामार्फत शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सरकारला सादर केले.
यावेळी कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष चुनप्पा पूजेरी बोलताना म्हणाले की, “शेतकऱ्यांनी दिवसरात्र कष्ट करून ऊस पिकवला आहे. त्यामुळे त्यांना यावर्षी ऊसाला योग्य भाव मिळाला पाहिजे, तसेच कारखान्यांनी ऊसाचे बिल त्वरित जाहीर करून गाळप सुरू केले पाहिजे.”
यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते.


Recent Comments