चिकोडी शहरातील लक्ष्मी लीला वृद्धाश्रमातील वृद्धांकडे पाहून, तहसीलदार राजेश बुरली यांना त्यांच्या दिवंगत मातोश्रींची आठवण झाली आणि तेथेच त्यांना अश्रू अनावर झाले.

लक्ष्मी लीला वृद्धाश्रमातील नूतन खोल्यांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी तहसीलदार राजेश बुरली आले होते. कार्यक्रमाला संबोधित करताना ते अत्यंत भावूक झाले.
यावेळी तहसीलदार राजेश बुरली म्हणाले: “जीवनात सर्वकाही मिळते, पण आई-वडील परत मिळत नाहीत. वृद्धाश्रम कमी व्हायला पाहिजेत, त्यांची संख्या वाढू नये. मात्र, अलीकडच्या काळात ग्रामीण भागांमध्येही वृद्धाश्रम होत आहेत, ही खूप वेदनादायक बाब आहे. मी वैयक्तिकरित्या या वृद्धाश्रमाला यथाशक्ती मदत करत राहीन.”असे आश्वासन त्यांनी दिले.


Recent Comments