महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर अलीकडेच विशेष मोहीम राबवून महाराष्ट्र पोलिसांनी तब्बल १ कोटी रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.

कागवाड तालुक्यापासून १५ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्रातील मिरज येथील गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी ही धाड टाकली. या कारवाईत बनावट नोटा तयार करण्यामध्ये गुंतलेल्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, अटक केलेल्यांपैकी एक आरोपी महाराष्ट्रातील एका वाहतूक पोलिस ठाण्याचा वाहनचालक आहे. अटक केलेल्या आरोपींकडून एक मोटार, बनावट नोटा छापण्यासाठी वापरलेला प्रिंटर, कागद आणि बनावट नोटांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
बनावट नोटा तयार करणे आणि त्यांचा व्यवहार यासंबंधी सांगली, कोल्हापूर तसेच बेळगाव जिल्ह्याच्या सीमाभागातही पोलिस अधिक तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.


Recent Comments