“संपत्तीच्या वादातून माझी पत्नी आणि मुलांनी माझ्यावर हल्ला केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी माझ्या कारवर पेट्रोल टाकून तिला आग लावली,” असा गंभीर आरोप पुरोगामी शेतकरी शिवगौडा पाटील यांनी केला आहे.

चिक्कोडी शहरात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या पत्नीचे वडील आणि भाऊ मिळून त्यांची संपत्ती हडप करण्याचा कट रचत आहेत. “माझ्या नावावर सहा एकर जमीन आहे, तर पत्नीच्या नावावर मी एक एकर सोळा गुंठे जमीन केली आहे. तरीसुद्धा त्यांना माझी संपूर्ण मालमत्ता पाहिजे आहे.” माझी पत्नी मला अश्लील भाषेत शिवीगाळ करते. त्याशिवाय त्यांनी माझ्या पिकांमध्ये ट्रॅक्टर फिरवून ते नष्ट केले आहे. “पेट्रोल ओतून त्यांनी माझ्या ईको कारला आग लावली असून, लाकडी दांड्याने मला मारहाण केली आहे,” अशा शब्दांत शिवगौडा पाटील यांनी डोळ्यात पाणी आणून आपले दुःख व्यक्त केले.



Recent Comments