भाषण ऐकून पाठिंबा दिलात, तर हुक्केरीचा विकास होणं अशक्य आहे. त्यामुळे विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीत दिवंगत अप्पणगौड पाटील पॅनेललाच पाठिंबा द्यावा, असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलं.

हुक्केरी तालुक्यातील माडिहळ्ळी गावात विद्युत सहकारी संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
“हुक्केरीत बदलाची हवा आहे. ही निवडणूक जरी लहान असली तरी यात तुमची स्वप्नं दडलेली आहेत. पूर्वी तुम्ही एका कुटुंबासमोर मान झुकवत होतात, पण आता तुमची मुलं झुकणार नाहीत, यासाठी एकदा संधी द्या,” असं त्यांनी स्पष्ट केलं. रमेश कत्ती म्हणतात की टीसी आणायला गोकाकला जावं लागतं. पण या निवडणुकीत आम्ही कुणीही उमेदवार नाही. तुमच्याच भागातील लोक निवडणुकीला उभे आहेत. त्यामुळे ते तुमच्या प्रश्नांना नक्कीच प्रतिसाद देतील,” अशी ग्वाही मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली.
“जयगौड पाटील यांच्या नेतृत्वाखालील नवीन कार्यकारिणी स्थापन झाली आणि तीन महिन्यांत कुणालाही टीसी आणायला जावं लागलेलं नाही. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनेक लोक समाधानी आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी पुन्हा त्यांनाच पाठिंबा द्यावा,” असे आवाहन देखील त्यांनी केले. याचवेळी माडिहळ्ळी गावातील शेकडो युवकांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या युवकांचं स्वागत करताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या लोकाभिमुख योजना आणि विकासकामं पाहून जनता स्वयंस्फूर्तीने आमच्याकडे येत आहे. आगामी काळात हुक्केरी तालुक्यात युवकांनी पक्ष संघटन मजबूत करावं.” अशा शब्दांत त्यांनी पक्षबांधणीचा आग्रह व्यक्त केला.
कार्यक्रमात स्थानिक काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांचीही उपस्थिती होती.


Recent Comments