Hukkeri

हुक्केरीच्या लोकांनी बदलण्याची गरज : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

हुक्केरीच्या राजकारणात जारकीहोळी आणि कत्ती गटांमधील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री सतीश जारकीहोळी यांनी कत्ती गटाचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.

हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेचे मीटरधारकच मालक आहेत. मात्र, येथील लोक तुमच्याच डोळ्यांत तुमचेच बोट खुपसतात. हुक्केरीच्या लोकांनी बदलण्याची गरज असल्याचे सतीश जारकीहोळी म्हणाले.

त्यांनी हुक्केरी विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत अप्पणगौडा पाटील यांच्या पॅनेलला सहकार्य करावे, अशी मागणी केली. मागील ३० वर्षांपासून असलेल्या या संस्थेचा आता किती विकास झाला आहे, हे मतदारांनीच सिद्ध करायचे आहे. ‘आम्हाला कोणी चांदीची गदा किंवा चांदीची मूर्ती दिली नाही. हुक्केरी तालुक्यातील लोकांनी बदलायला हवे. मीटरधारकच या संस्थेचे मालक आहेत. ती संस्था तुमची आहे. तुमच्याच डोळ्यांत तुमचेच बोट खुपसणारे लोक इथे आहेत’, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे कत्ती गटावर आरोप केले.

Tags: