बेळगाव जिल्ह्यातील रयबाग तालुक्यात येणाऱ्या दिगवाडी गावात ग्रामस्थांनी एका मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले आहे. या घटनेमुळे गावातील लोकांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून असलेले भीतीचे वातावरण कमी झाले आहे.

ही घटना काल रात्री घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ही मगर गावातील लोकांची झोप उडवत होती. ती अधूनमधून दिसून येत असल्यामुळे लोकांमध्ये दहशत पसरली होती. रात्रीच्या वेळी ही मगर दिसताच, ग्रामस्थांनी एकत्र येत तिला दोरीने बांधले आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्याकडे सुपूर्द केले. वनविभागाने मगरीला ताब्यात घेऊन सुरक्षित स्थळी सोडले आहे.


Recent Comments