केवळ सेनापती तयार करणे हेच नाही, तर काँग्रेस पक्षाला सैनिकांचीही गरज आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून, पक्षासाठी ‘कार्यकर्ता दल’ तयार करणे हेच कॅांग्रेस प्रचार समितीचे उद्दिष्ट आहे,” असे मत कर्नाटक प्रदेश कॅांग्रेस प्रचार समितीचे राज्याध्यक्ष आणि माजी मंत्री विनयकुमार सोरके यांनी व्यक्त केले.

चिकोडी शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सभागृहात आयोजित चिकोडी जिल्हास्तरीय कॅांग्रेस पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. “आगामी जिल्हा परिषद, तालुका परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुका सक्षमपणे लढण्यासाठी पक्षाने आतापासूनच पाऊले उचलली आहेत. सामाजिक बांधिलकी असलेल्या काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी योजना या निवडणुका जिंकण्याचा आधार आहेत,” असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
प्रचार समितीचे राज्य उपाध्यक्ष मुनीर जनसाली म्हणाले, “राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते तयार करणारे बूथ स्तरावरील कार्यकर्तेच असतात. त्यामुळे बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची जबाबदारी खूप महत्त्वाची आहे.”
या बैठकीत कॅांग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस राहुल जारकीहोळी, चिकोडी जिल्हा कॅांग्रेस समितीचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्यासह अनेक नेत्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मल्लिकार्जुन राशिंगे, सिद्दीक अंकालगी, संतोष मुडसी, निर्मला पाटील, रमेश पाटील, शरणप्पा कोटगी, प्रभाकर कोरे, साबिर जमादार, गुलाबहुसेन बागवान, रवी पाटील, रामकृष्ण पानबुडे, सतीश कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments