महाराष्ट्रातील कोकण विभागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. परिणामी, कृष्णा नदीच्या काठावरील कल्लाेळ येथील दत्त मंदिर पाण्याखाली गेले आहे.

आज कृष्णा नदीत १ लाख ५० हजार क्युसेक पाणी वाहत आहे. यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ५ फुटांची वाढ झाली आहे आणि पाण्याची पातळी क्षणोक्षणी वाढत आहे. कल्लाेळ गावातील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले असल्याने, भाविकांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे. नदीकाठी कोणीही जाऊ नये यासाठी तालुका प्रशासनाने बॅरिकेट्स लावले आहेत.


Recent Comments