Chikkodi

चिक्कोडीत धर्मस्थळ मंदिराच्या अपप्रचाराचा निषेध

Share

श्री क्षेत्र धर्मस्थळ मंजुनाथ स्वामी मंदिर आणि हेगडे कुटुंबाची बदनामी करणाऱ्या लोकांवर सरकारने योग्य तपास करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करत चिकोडी येथे भक्तांनी मूक मोर्चा काढला.

जयनगर येथून मोर्चाला सुरुवात झाली आणि तहसील कार्यालयापर्यंत तो पोहोचला. उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. धर्मस्थळचे भक्त आणि विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी काही ‘यूट्यूबर्स’वर योग्य कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी जैन समाजाचे नेते म्हणाले की, “धर्मस्थळ हे पवित्र क्षेत्र आहे. त्याची आणि धर्माधिकारी डॉ. वीरेंद्र हेगडे यांची बदनामी करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी. सरकार करू शकत नाही अशी अनेक चांगली कामे डॉ. वीरेंद्र हेगडे करत आहेत. सामाजिक क्षेत्रात अनेक चांगली कामे करणाऱ्या हेगडे यांच्या पाठिशी आपण सर्वांनी एकजुटीने उभे राहिले पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी धन्यकुमार गुंडे, श्रीपाद मुन्नोळी, एम. के. पुजारी, डॉ. एन. ए. मगदुम्म, नानासाहेब पाटील, चौगला वकील, दिवाकर बडिगेर, पी. जी. कुन्नूर, तुकाराम पाटील, विश्वनाथ पुराणिकमठ, सतीश उपाध्याय, अजय सूर्यवंशी, निंगप्पा बडिगेरे, गुरुनाथ कडेलि, बाहुबली नागानूर, रमेश पाटील, शीतल बागे, जीवन तोरबल्ले, अप्पासाहेब पाटील, बाळासाहेब शिंदे यांच्यासह इतरही अनेक जण उपस्थित होते.

Tags: