Chikkodi

चिकोडीमध्ये १.६५ कोटी रुपयांच्या विकासकामांना सुरुवात

Share

काडापूर गावातील रस्त्याचे रुंदीकरण तसेच इतर विविध विकासकामे हाती घेण्यात यावीत, या ग्रामस्थांच्या मागणीनुसार चिक्कोडीतील विविध भागात आमदार प्रकाश हुक्केरी यांच्याहस्ते विकासकामांचा प्रारंभ करण्यात आला.

२०१९ मध्ये कृष्णा नदीला आलेल्या भीषण पुरावेळी लोकांची जीवनवाहिनी ठरलेल्या काडापूर गावातील रस्त्याचे रुंदीकरण तसेच इतर विविध विकासकामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार, १.६५ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांसह, स्ट्रीट लाईट आणि गटारांच्या कामांना सुरुवात झाली आहे, असे कर्नाटक सरकारचे दिल्लीतील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी म्हणाले.

चिकोडी तालुक्यातील काडापूर गावात १.६५ कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचे भूमीपूजन केल्यानंतर ते बोलत होते. सरकारी निधीचा योग्य वापर करून या कामांमध्ये गुणवत्तेला प्राधान्य दिले जात आहे. ग्रामपंचायत कार्यालयापासून नवीन बसस्थानकापर्यंतचा संपर्क यामुळे सुकर होणार आहे. याशिवाय पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या समस्यांवरही कायमस्वरूपी तोडगा निघेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी नेते प्रकाश राचण्णवर म्हणाले की, विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या दृढनिश्चयामुळे काडापूर गावात अनेक विकासकामे झाली आहेत. अशा कामांमुळे गावाला एक नवीन रूप मिळणार असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

Tags: