“सैनिकांमुळेच आपला देश सुरक्षित आहे. सर्वांनी एकजुटीने राहायला हवे. सैनिक आपले जीवन भारताच्या सेवेसाठी समर्पित करतात. आपण सुरक्षित आहोत, याचे कारण सीमेवर रक्षण करणारे सैनिक आहेत,” असे आमदार अभय पाटील म्हणाले. बेळगावात शनिवारी आयोजित २६ व्या कारगिल आणि ऑपरेशन सिंधूर विजयोत्सवाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

आम. अभय पाटील बोलताना म्हणाले, सैनिक सेवेतून निवृत्त झाले तरी त्यांचा उत्साह कमी होत नाही. देशाच्या सीमेवर उभे राहून शत्रूंच्या गोळ्यांना छाती देणाऱ्या वीर जवानांबद्दल कितीही सांगितले तरी ते कमीच आहे.
एम.एल.आर.आय.सी.चे कर्नल जॉनी यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी बाहेरून आलेल्या लोकांना पाहिले आणि ते आपले सैनिक नसल्याची माहिती सैन्याला दिली. हे ‘कारगिल विजय’ नसून, ‘ऑपरेशन विजय’ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
२६ व्या कारगिल आणि ऑपरेशन सिंधूर विजयोत्सवानिमित्त वडागाव येथील आदर्श विद्यालयातून ४ किलोमीटर लांबीची मशाल बाईक रॅली काढण्यात आली. या बाईक रॅलीत महिला, लहान मुले, युवक आणि निवृत्त सैनिकांनी सहभाग घेतला.


Recent Comments