मुसळधार पावसाने निसर्गाचे रौद्र आणि तितकेच सुंदर रूप धारण केले आहे. मलप्रभा नदीचे उगमस्थान असलेल्या कणकुंबी माऊली मंदिराचा परिसर, तसेच चिकले धबधबा आणि पारवाडची मनमोहक स्थळे सध्या पर्यटकांना अक्षरशः खुणावत आहेत. खानापूर तालुक्यातील हे नैसर्गिक वैभव सध्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे.

पर्यटकांना साद घालत आहे चिकले धबधबा आणि पारवाडचे मनमोहक दृश्य! मलप्रभा नदीचे उगमस्थान असलेल्या कणकुंबी माऊली मंदिराच्या परिसरातील निसर्ग मुसळधार पावसामुळे अधिकच सुंदर झाला आहे. निसर्गप्रेमींसाठी हे दृश्य डोळ्यात साठवण्यासारखे आहे. निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी या ठिकाणांना भेट देण्यासाठी पर्यटकांची पाऊले आपसूकच वळत आहेत.
खानापूर तालुक्यातील नैसर्गिक सौंदर्य पाहून अंगावर रोमांच उभे राहतात. रिमझिम पावसातही निसर्गाची अशी मनमोहक दृश्ये केवळ खानापूर तालुक्यातच पाहायला मिळतात.


Recent Comments