Belagavi

स्पर्धात्मक युगात मुलांना केवळ गुणांपुरते मर्यादित ठेवू नका: मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

Share

आजच्या आधुनिक युगात मुले यंत्रमानव बनत आहेत. या स्पर्धात्मक युगात मुलांना केवळ गुण मिळवण्यापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना साहित्याची आवड निर्माण करणारे नागरिक म्हणून घडवले पाहिजे, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले.

बेळगाव येथील कुमार गंधर्व रंगमंदिर येथे शनिवारी आयोजित बेळगाव जिल्हा प्रथम बाल साहित्य संमेलन-२०२५ च्या कार्यक्रमात बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी, या संमेलनामुळे मुलांमध्ये आणि बाल साहित्यिकांमध्ये नवा उत्साह व चैतन्य निर्माण होवो, अशी सदिच्छा व्यक्त केली.

मुलांच्या विकासासाठी माझ्या विभागात अनेक कार्यक्रम आहेत, ज्याचा फायदा प्रत्येकाने घ्यावा. पुढील संमेलनासाठी माझ्या विभागाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. हे संमेलन केवळ बाल साहित्यिक आणि ज्येष्ठ साहित्यिकांपुरते मर्यादित न राहता, बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्या पुढे म्हणाल्या, मुलांमध्ये आपले आचार-विचार वाढले पाहिजेत आणि ते इतरांपर्यंत पोहोचले पाहिजेत असे मत व्यक्त केले. आपल्या राज्यात मुलांच्या प्रतिभेची कमतरता नाही. मुलांनी साहित्यात रुची वाढवल्यास, ते भविष्यात राज्याचे अभिमानास्पद साहित्यिक बनतील यात शंका नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला हुक्केरी हिरेमठ येथील श्री चंद्रशेखर शिवाचार्य, कारंजीमठ येथील परमपूज्य श्री गुरुसिद्ध महास्वामी, एम.वाय. मेनसिनकाई, अमूल्य पाटील, बसवराज गार्गी, लक्ष्मी पाटील, एम.एम. संगण्णावर, सिद्धराम निलजगी, प्रकाश होसमनी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: