बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील अंकली गावात एका १५ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गोविंद सचिन कांबळे (१५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. तो महाराष्ट्रातील अलास गावचा रहिवासी असल्याचे समजते. गेल्या एक वर्षापासून गोविंद अंकली गावात राहत होता. आज पहाटे त्याने गोठ्यात दोरीने गळफास लावून घेतला. मयत मुलगा मानसिक अस्वस्थतेने ग्रस्त होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. ही घटना अंकली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.



Recent Comments