सीमा प्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून पुन्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील माने यांची आज कोल्हापूर येथे बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रमुख रमाकांत कोंडुस्कर यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

या भेटीदरम्यान येणाऱ्या काळात लवकरात लवकर तज्ञ समितीची बैठक लावून व या अधिवेशनाच्या काळात सीमा प्रश्न विषयी नक्कीच विषय मांडू. वैद्यकीय शैक्षणिक व शासकीय क्षेत्रात सुद्धा आपण सीमा भागातल्या अजून चांगल्या रीतीने सेवा पोचू.

व सीमा भागातल्या जनतेच्या तळागाळात पोचून होणारा अन्याय थांबू. दोन दिवसापूर्वी राज्यसभा सदस्यांनी सीमा प्रश्न हा संपलेला विषय आहे असे वक्तव्य केले. त्यामुळे समस्त सीमा भागातल्या जनतेचा अपमान झाला आहे. याविषयी आपण संसदेत नक्की आवाज उठवू असा आश्वासन दिले.


Recent Comments