मुख्यमंत्री सिद्धरामय्या ‘बोगस’ सरकार चालवत असून, कागवाडचे आमदार राजू कागे यांना ‘बोगस’ पत्र दिले आहे. हे ‘बोगस’ सरकार लवकर घरी गेले पाहिजे, असे जोरदार टीका बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली.

आज बेळगावात पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी कागवाडचे आमदार राजू कागे यांना ‘बोगस’ निधी मंजुरीचे पत्र देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्यमंत्र्यांनी निधी नसतानाही ‘बोगस’ पत्र दिले आहे. ते ‘बोगस’ सरकार चालवत आहेत. किंवा टक्केवारी न मिळाल्याने निधी दिला नाही, असा आरोपही पाटील यांनी केला. हे ‘बोगस’ सरकार लवकर घरी जावे. मुख्यमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.
याव्यतिरिक्त, आपल्या मतदारसंघात मागील सरकारने दिलेल्या निधीतूनच विकासकामे सुरू असल्याचे अभय पाटील यांनी सांगितले. काँग्रेस सरकारने भाजपने दिलेल्या ३५५ कोटी रुपयांचा निधी परत घेतला आहे. भाजप सरकारने मंदिरांसाठी दिलेला निधीही मंजूर केला जात नाहीये. अधिवेशन सुरू झाल्यावर जनताच संतापून रस्त्यावर उतरण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही ते म्हणाले.


Recent Comments