karnatak

भाजपकडून राजकीय फायद्यासाठी ईडीचा गैरवापर : मंत्री संतोष लाड

Share

अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या घटनेने खूप दुःख झाले आहे. विमान टेक-ऑफ घेतल्यानंतर काही क्षणांतच दोन्ही इंजिन निकामी झाले. अशी घटना घडणे अत्यंत दुर्मिळ आहे. दुर्घटनाग्रस्त विमान फार जुने नव्हते. अशी घटना घडायला नको होती, असे उद्गार मंत्री संतोष लाड यांनी काढले. कुंदगोळ तालुक्यातील हांचनाळ गावात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बल्लारीचे खासदार आणि काँग्रेस आमदारांच्या घरावर ईडीने छापे टाकले आहेत. याबाबत मी थेट टीका करणार नाही. गेल्या अकरा वर्षांत साडेचार हजार ईडी छापे पडले आहेत, परंतु यशाचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. देशात सर्वाधिक ईडी छापे काँग्रेसशासित राज्यांमध्ये पडले आहेत, असे ते म्हणाले.

ईडीच्या कारवाईबाबत सर्वोच्च न्यायालयानेही कानउघाडणी केली आहे. राजकीय फायद्यासाठी ईडीचा गैरवापर केला जात आहे. भाजप सरकारच्या इलेक्ट्रोल बॉन्डमधील पैशांचे काय झाले? तिथे ईडीने छापे का टाकले नाहीत? आयपीएल सट्टा कंपन्या आणि गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांनीच सर्वाधिक इलेक्ट्रोल बॉन्ड घेतले आहेत. गोमांस निर्यातदारांकडून देणग्या घेऊन भाजपने पक्ष उभारला आहे. कोणी किती पैसे दिले, यावर चर्चा व्हायला हवी, असेही ते म्हणाले.

Tags: