Belagavi

जायंट्स आय फाउंडेशनकडून नेत्रदानाचा जागर

Share

 

माजी अध्यक्ष शिवराज पाटील यांनी जायंट्स आय फाउंडेशनच्या स्थापनेपासून सुरू असलेल्या कार्याची माहिती देत प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे अभियंता आर एम चौगुले यांनी प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात सचिव विजय बनसुर यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

त्यानंतर जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी सांगितले की, जरी आपण कामामुळे समाजासाठी प्रत्यक्ष कार्य करू शकलो नसलो तरी, मृत्यूनंतर नेत्रदान करून आपले सामाजिक योगदान नक्कीच देऊ शकतो.

अध्यक्षीय समारोप करताना मदन बामणे यांनी माहिती दिली की, २०१८ साली स्थापन झालेल्या जायंट्स आय फाउंडेशनच्या माध्यमातून दीडशेहून अधिक जणांनी मरणोत्तर नेत्रदान केले आहे. यामुळे तीनशेहून अधिक दृष्टिहीनांना ही सुंदर सृष्टी पाहण्याचे भाग्य लाभले आहे.

यावेळी संचालक उमेश पाटील, अजित कोकणे, प्रदीप चव्हाण, राहुल बेलवलकर, वाय एन पाटील, राजू बांदिवडेकर, प्रकाश तांजी, सुनील मुरकुटे, सुरेश पाटील, आमोद मुचंडीकर, जीवन कदम, प्रसाद कदम, राज सावगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते. अशोक हलगेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले

Tags: