आयपीएल स्पर्धेत आरसीबीने अंतिम फेरी गाठल्याने बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. आज आयपीएल स्पर्धेचा महत्त्वाचा अंतिम सामना होत असून, “आरसीबी आमचाच” ही भावना प्रत्येकात आहे, असे ते म्हणाले.

कर्नाटकातील जनता आरसीबीबद्दल उत्सुक असून, देशभरातही आरसीबीचे चाहते आहेत. आरसीबी जिंकेल असा विश्वास मलाही आहे, असे शेट्टर यांनी सांगितले. करोडो लोकांच्या अपेक्षेनुसार आरसीबीने कप जिंकावा. “यावर्षी कप आपलाच” म्हणत त्यांनी आरसीबी संघाला शुभेच्छा दिल्या.
माझा आवडता खेळाडू विराट कोहली असून, मी सुद्धा अंतिम सामना पाहणार असल्याचे शेट्टर यांनी सांगितले. अंतिम सामन्याबद्दल खूप अपेक्षा आहेत आणि चाहत्यांच्या अपेक्षांनुसार आरसीबी खेळत आहे. क्रिकेट आणि आयपीएलबद्दल स्वाभाविकपणे क्रेझ आहेच. अनेक वर्षांनंतर आरसीबी अंतिम फेरीत पोहोचली आहे. अंतिम सामना जिंकण्याची जिद्द आरसीबीमध्ये आहे आणि ते नक्कीच जिंकतील, असा विश्वास शेट्टर यांनी व्यक्त केला.


Recent Comments