पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत जोरदार क्षेपणास्त्र हल्ला केला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर बेळगावच्या खडक गल्ली परिसरात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मेच्या मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंधूर’ राबवत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला.
या कारवाईत पाकिस्तानात स्थित सुमारे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले असून, जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तैयबा या संघटनांवर थेट प्रहार करण्यात आला आहे. भारतीय लष्कराच्या या कडक कारवाईचे देशभरात स्वागत होत असून बेळगावच्या खडक गल्ली परिसरातील नागरिकांनी फटाके फोडून, जयघोष करत विजयोत्सव साजरा केला.


Recent Comments