खानापूर तालुक्यातील कुसमळी येथील महालक्ष्मी देवीला फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या पुढाकारातून बेळगावमधील उद्योजक दाम्पत्याने चांदीचा भव्य मुकुट अर्पण केला आहे.

कुसमळी येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर देवी लवकरच मूळ गर्भगृहात विराजमान होणार आहे. या शुभप्रसंगी बेळगावच्या उद्यमबागेतील आरईसी फ्लो टेक्नॉलॉजीज एलएलपीचे संस्थापक उद्योजक मधु रुकमण्णा हाशिलकर आणि ज्योती मधु हाशिलकर या दाम्पत्याने देवीला चांदीचा भव्य मुकुट अर्पण केला. फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष आर. दरेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि भक्तांना एकत्र आणून या उपक्रमाला सुरुवात केली.

संतोष दरेकर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक दानशूर व्यक्तींनी मंदिरातील विविध सेवांसाठी मदत केली. सदानंद तेरगावकर दाम्पत्याने दहा किलो वजनाची मंदिराची घंटा अर्पण केली. शहापूर येथील सिंधूर सिल्क्सचे मालक सुनील धोंगडी यांनी देवीला रेशमी साडी भेट दिली. तसेच संजय अनवेकर, वंदना संगवय्या, राजू काकती, नकुल तुमरी, विश्वास तुमरी, विशाल तोन्ननवर, वीणा मिरजकर आणि लक्ष्मी सोरटूर यांनी महाप्रसादासाठी लागणारे किराणा साहित्य आणि भाजीपाल्याची मदत केली. भक्तीचे रूपांतर सेवेत झाले की प्रत्येक देणगी देवाच्या चरणी अर्पण होते, असे सांगत संतोष दरेकर यांनी सर्व दानशूरांचे आभार मानले.


Recent Comments