Belagavi

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या बेळगावात; ‘सेव्ह डेमोक्रसी’ संवादाचे आयोजन

Share

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या, २८ नोव्हेंबर रोजी बेळगाव दौऱ्यावर येत आहेत. लोकशाहीचे संरक्षण आणि देशाची सुरक्षा या विषयांवर ते शहरातील मान्यवर नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. धर्मनाथ भवन येथे दुपारी ३.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

विरोधकांकडून होणारा अपप्रचार आणि देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींविरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने या संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सुमारे ६५० ते ७०० मान्यवर उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. जात, धर्म आणि भाषेचे भेद बाजूला ठेवून बेळगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी केले.

‘सेव्ह डेमोक्रसी फ्रॉम अराजकता’ या शीर्षकाखाली आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण सहभागी होणार असल्याची माहिती भाजप नेते एम. बी. झिरली यांनी दिली.

Tags: