Belagavi

कणबर्गी गावात बससेवेअभावी विद्यार्थी त्रस्त

Share

बेळगाव शहरातून कणबर्गी गावाकडे जाणारी बससेवा अनियमित झाल्याने विद्यार्थी आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नियमित बससेवा सुरू करण्याची मागणी करूनही परिवहन विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुमारे २५ हजार लोकसंख्या असलेल्या कणबर्गी गावात काही वर्षांपूर्वी दोन बस नियमित धावत होत्या. मात्र, गेल्या वर्षभरापासून एकही बस नियमितपणे धावत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सकाळी ८ ते १० या वेळेत बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. परिणामी त्यांना वेळेत वर्गात पोहोचणेही कठीण झाले आहे.

या समस्येबाबत परिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रकांकडे अनेकदा निवेदने देऊनही उपयोग झालेला नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन कणबर्गी गावासाठी नियमित बससेवा सुरू करावी, अशी मागणी स्थानिक किसान सुंठकर यांनी केली आहे.

Tags: