बेळगावातील हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थापनासाठी होणाऱ्या खर्चात करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे. जर्मन टेंट, सीसीटीव्ही भाडे आणि व्हीआयपी खोल्यांच्या वाटपाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
२०२४ मध्ये पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी जर्मन टेंट उभारण्यावर सुमारे ४ कोटी ७४ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे गडाद यांनी सांगितले. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे भाड्याने घेण्यावरही मोठा खर्च होत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरातील नामांकित हॉटेलमध्ये २५५ व्हीआयपी खोल्यांचे वाटप करण्यात आले असून, सुरक्षेचे कारण देत त्यात वास्तव्यास असलेल्यांची माहिती दिली जात नसल्याचे त्यांनी नमूद केले. मंत्री आणि आमदारांच्या समर्थकांसह विविध संघटनांच्या अध्यक्षांनाही सरकारी खर्चातून खोल्या दिल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणी दोन्ही सभागृहांच्या पीठासीन अधिकाऱ्यांना कागदपत्रांसह पत्र पाठवून सर्वंकष चौकशीची मागणी करण्यात आली आहे. खोल्यांच्या वाटपाचे निकष, सीसीटीव्ही भाडेदर आणि कॅमेरे कायमस्वरूपी खरेदी करण्याच्या शक्यतेची तपासणी करावी, अशी मागणी गडाद यांनी केली.
या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात लोकायुक्त किंवा न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भीमाप्पा गडाद यांनी दिला.


Recent Comments