बेळगाव सीमाप्रश्नी मराठी भाषिकांच्या भूमिकेला विरोध दर्शवत मंत्री एच. के. पाटील यांनी पुन्हा एकदा महाजन अहवालाचे पालुपद आळवले आहे. महाजन अहवाल अंतिम असल्याचा आग्रह धरत त्यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणारी भूमिका मांडली.
महाजन अहवाल किंवा जैसे थे स्थिती हाच कन्नडिगांचा अंतिम निर्धार असल्याचे सांगत त्यात कोणालाही बदल करता येणार नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. सीमाप्रश्नी मराठी भाषिकांच्या भूमिकेचा विचार न करता महाजन अहवालाचाच आधार घेणाऱ्या या भूमिकेतून त्यांनी कन्नड भाषिकांच्या आंदोलनाचे समर्थन केले आणि सीमाभागातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. जलवाटपातील अन्यायाविरोधात लढा सुरू ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. कन्नड भाषेच्या पिछेहाटीवर आमदारांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्याची मागणी करत सुवर्णसौध परिसरात नाडदेवी भुवनेश्वरीचा पुतळा उभारण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

बेळगावचे हिवाळी अधिवेशन केवळ आंदोलनांपुरते किंवा औपचारिकतेपुरते मर्यादित न राहता उत्तर कर्नाटकासह संपूर्ण राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर तोडगा काढणारे व्यासपीठ ठरावे, अशी भूमिका पाटील यांनी मांडली.
संत बसवेश्वरांवरील वादग्रस्त पुस्तक आणि त्यातील अपरिपक्व विवेचनाचा त्यांनी निषेध केला. राज्य सरकारने संत बसवेश्वरांना सांस्कृतिक नेते म्हणून घोषित केले असून, त्यांचे तत्त्वज्ञान आणि अनुभव मंटपाचा संदेश संपूर्ण जगाला मार्गदर्शक असल्याचे एच. के. पाटील यांनी सांगितले.


Recent Comments