Belagavi

ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमाफीची मागणी

Share

कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेने ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना टोलमाफी देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन देऊन आठवडाभराची मुदत देण्यात आली.

राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून अवाजवी टोलवसुली केली जात असल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना केंद्र व राज्य सरकारकडून अद्याप आर्थिक मदत किंवा टोलसवलत मिळालेली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व टोलनाक्यांवर ऊसवाहतूक करणाऱ्या वाहनांना संपूर्ण टोलमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

आठवडाभरात मागणी मान्य न झाल्यास राज्यभरातील महामार्गांवरील टोलनाके बंद करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला.

यावेळी रामनगौडा पाटील, प्रकाश नाईक, प्रेम चौगला, किशन नंदी, आस्था आणि बी. के. राजू यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते.

Tags: