Belagavi

प्रसिद्ध हणमशेट स्वीट्सचे ज्येष्ठ संचालक जयंत हणमशेट यांचे निधन

Share

बेळगावमधील प्रसिद्ध हणमशेट स्वीट्सचे ज्येष्ठ संचालक आणि उद्योजक जयंत विष्णुपंत हणमशेट यांचे शनिवारी निधन झाले. निधनसामयी ते ७५ वर्षांचे होते.

मराठा कॉलनी येथील रहिवासी असलेले जयंत हणमशेट हे मेणसे गल्लीतील हणमशेट स्वीट्सचे ज्येष्ठ संचालक होते. त्यांनी वंशपरंपरागत मिठाई व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेला. तसेच घाऊक व्यापार क्षेत्रातही विस्तार करून हणमशेट ब्रँडला प्रतिष्ठा मिळवून दिली.

व्यवसायासोबतच ते समाजकार्यातही अग्रेसर होते. प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता त्यांनी विविध सामाजिक आणि धार्मिक कार्यांना उदार मदत केली. त्यांच्या निधनाने वैश्यवाणी समाज आणि बेळगाव शहराची हानी झाली आहे.

Tags: