बेळगावातील ब्रिटिशकालीन उपनोंदणी कार्यालयाची जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू झाले आहे. या ठिकाणी आधुनिक सुविधांनी युक्त नवीन इमारत उभारण्यात येणार असून, सध्या कार्यालयाचे कामकाज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस सुरू आहे.

ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आलेली ही इमारत अनेक दशकांपासून नागरिकांना सेवा देत होती. मात्र, इमारत जीर्ण झाल्याने ती पाडून त्या जागी आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रशस्त सुविधांसह नवीन कार्यालय उभारण्याची तयारी प्रशासनाने केली आहे.


इमारत पूर्णपणे पाडून जागा मोकळी करण्यासाठी सुमारे एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता असल्याची माहिती तेथील अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी दिली.
मालमत्ता नोंदणीसह कार्यालयीन कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपनोंदणी कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस स्थलांतरित करण्यात आले आहे. तेथून सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरू आहेत.


Recent Comments